Namo shetkari samman yojana : नमो शेतकरी सम्मान योजना 2023 महाराष्ट्र | अर्ज , पात्रता , हप्ता तारीख संपूर्ण मराठी महिती |

sarkarisamrat.com
5 Min Read
तुमच्या मित्रांना पाठवा -

Namo shetkari samman yojana : नमो शेतकरी सम्मान योजना (अर्ज ,पात्रता , हप्प्ता तारीख ) (apply, eligibility, form, installment date)


नमस्कार मित्रांनो , महाराष्ट्र मुखमंत्री यांनी नमो शेतकरी सम्मान योजना सुरु करण्याची घोषणा केली होती. केंद सरकारच्या प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजने प्रमाणेच महाराष्ट्रात मुखमंत्री महासम्मान निधी योजना सुरु करणार आहे. विशेष म्हणजे या योजनेला माननीय प्रधानमंत्रि नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे .  या योजनेला नमो शेतकरी सम्मान निधी योजना  असे नाव देण्यात आले आहे.

हि योजना शेतकऱ्यांसाठी आहे. व नमो शेतकरी सम्मान योजना एक  सुवर्ण योजना आहे. ज्याचा मार्फत शेतकरी व्यक्तीच्या बँक खात्यावर 6000 रुपये पाठवण्यात येणार आहे. ज्यामुळे शेतकरी व्यक्तीला आर्थिक मदत देउन त्यांना स्वावलंबी सरकारचा बनवणे उद्देश आहे.

या नमो शेतकरी सम्मान निधी योजने मध्ये कोण पात्र आहे ? किती मदत मिळणार ? इत्यादी प्रश्नांची उत्तरे या लेखात दिलेली आहे. त्यामुळे हा लेख शेवट पर्यंत वाचा .



नमो शेतकरी योजना काय आहे ?

Namo shetkari samman yojana 2023 – राज्याचे मुखमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी योजनेची घोषणा विधान परिषदेत केलेली होती .आता हि योजना एप्रिल 2023   पासुन सुरु होऊ शकते .या योजनेचे शासकीय शासन निर्णय लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

ज्या प्रमाणे वार्षिक 6000 रुपये प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ म्हणून शेतकरी व्यक्तीला मिळतात , त्याचप्रमाणे 6000 रुपये वार्षिक  मुखमंत्री नमो शेतकरी सम्मान निधी योजनचे शेतकरी व्यक्तीला लाभ म्हणून  मिळणार आहे . यातील एक टप्पा हा 2000 चा असणार आहे. जो दर चार महिन्या नंतर शेतकऱ्याचा बँक खात्यात जमा होणार.  आता आपण योजनेसाठी पात्रता समजून घेऊया .


कोणाला मिळणार 6000 रुपये ?

Namo shetkari samman yojana पात्रतेसाठी मुख्य तीन अटी आहे.

  1.  जे व्यक्ती pm kisaan योजनेसाठी पात्र आहे ते व्यक्ती या योजनेसाठी पात्र असणार आहे .
  2. शेतकऱ्याचा नावावर 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी पासुन शेतजमीन नावावर असायला पाहिजे.
  3. शेतकरी व्यक्तीचे आधार कार्ड नंबर त्याचा बँक खात्याशी लिंक असायला हवे.

Namo shetkari samman yojana: योजनेचा लाभ कसा आहे ?

Namo shetkari samman yojana शेतकरी व्यक्तीला  वार्षिक 6000 रुपये लाभाच्या स्वरुपात देणार आहे . आणि ते 6000 रुपये तीन टप्प्यात शेतकऱ्याचा बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

प्रत्येक टप्पा हा 2000 हजार रुपये असणार आहे.  pm kisaan योजने प्रमाणेच या योजनेचे स्वरूप असणार आहे .  आता खाली आपण योजनेसाठी अर्ज करावा लागेल का ? या बद्दल पाहणार आहे .


हे पण वाचा – 

लेक लाडली योजना 2023. तुमच्या मुलीला मिळणार 75000 हजार रुपये

 येथे क्लिक करा .


पहिला हप्प्ता कधी येणार ?

पहिला हप्ता आलेला आहेत . दिनांक 26 ऑक्टोंबर रोजी शेतकऱ्याचा बँक खात्यावर 2000 रुपये जमा झालेले आहेत. जर तुमचे 2 हजार रुपये आले नसेल तर तुमच्या जवळच्या आपले सरकार क्रेंद ला भेट देऊन तुमची अडचण त्यांना सांगा.


अर्ज करावा लागणार का ?

pm kisan पोर्टर वर जाऊन अर्ज करावा . किवा आपले सरकार केंद्र ला भेट देऊन ठेऊन अर्ज करू शकता .


योजनेच्या अर्जासाठी लागणारे कागदपत्र –

जे कागदपत्र pm kisaan योजनेसाठी लागतात तेच कागदपत्र लागणार .ज्यामध्ये –

  1. आधार कार्ड
  2. सात बारा
  3. बँक पासबुक
  4. आठ अ
  5. मोबाईल नंबर

बाकी कागदपत्र शासन निर्णय आल्यावर कळेल .

त्यासाठी तुम्ही आम्हचा whatsapp ग्रुप जॉईन करा , तेथे तुम्हाला Namo shetkari samman yojana ची अपडेट मिळेल.


टीप –

शेतकर्यांनी आधार कार्ड नंबर आपल्या बँक खात्याशी लिंक करून ठेवावे.

कारण सरकार आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यावरच पैसे टाकणार आहे.


हे पण वाचा – 

लेक लाडली योजना 2023. तुमच्या मुलीला मिळणार 75000 हजार रुपये . 


महाराष्ट्रात किवी फळाची शेती होऊ शकते का ? किवी फळाची शेती कशी करतात?,

किवी फळाला इतकी मागणी का आहेत , जाणून घ्या .


FAQ.


  1. नमो शेतकरी सम्मान निधी योजनेत किती रुपये मिळणार आहे ?

उत्तर – शेतकर्यांना वार्षिकी 6000 रुपये मिळणार आहे.


2.  योजनेत किती हप्ते असणार आहे व किती महिन्या नंतर हप्ता येणार ?

उत्तर – या Namo shetkari samman yojana वार्षिकी तीन हप्ते असणार आहे . जे दर चार महिन्या नंतर येणार आहे.


3 . योजनेचा पहिला हप्ता कधी येणार ?

उत्तर – अजून शासन निर्णय आलेला नाही , परंतु जून महिन्यात पहिला हप्ता येण्याची शक्यता आहे.


हे पण वाचा – 

.पीएम विश्वकर्मा योजना : फक्त 5% व्याज 3 लाखाचे कर्ज ,

15 हजार रुपये,आणि प्रतिदिवस 500 रुपये मिळणार.

आत्ताच अर्ज करा 



तुमच्या मित्रांना पाठवा -
8 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *