Maagel tyala vihir yojana | मागेल त्याला विहीर योजना 2023 | आता मिळणार 4 लाख रुपये अनुदान | अर्ज प्रकिया ,पात्रता .

sarkarisamrat.com
8 Min Read
तुमच्या मित्रांना पाठवा -

Maagel tyala vihir yojana | मागेल त्याला विहीर योजना 2023 | आता मिळणार 4 लाख रुपये अनुदान | अर्ज प्रकिया , पात्रता. ( apply , eligibility, gr etc. )


      नमस्कार मित्रांनो , प्रत्येक शेतकर्यासाठी विहीर एक महत्वाचे साधन आहे . ज्याचा उपयोग करून शेतकरी आपले  उत्पन्न दोन  ते चार पट  करते. विहिरीतून मिळणारे पाणी हे शेतकर्यांना जास्त उत्त्पन कमावून तर देतेच . सोबत एका वर्षात अनेक पिके व भाजीपाला लावायची संधी  पण देते . तर प्रत्येक  शेतकऱ्याचा  शेतात विहीर असावी हा उद्देश  ठेऊन राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी मागेल त्याला विहीर योजना सुरु केली आहे .

विशेष म्हणजे या योजनेत 4 लाखाचे अनुदान मिळणार आहे . आता हे चार लाख अनुदान कसे मिळणार ?तसेच अर्ज कुठे करायचा इत्यादी प्रश्नाची उत्तर आपण या लेखात पाहणार आहोत . तर हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा .


मागेल त्याला विहीर योजनेचे स्वरूप –

शेतकरी मित्रानो आता कोरडवाहू जमीन देखील बागायती होणार आहे . कारण आपले महाराष्ट्र सरकार शेतकर्यांना 100 % टक्के अनुदानावर विहीर देणार आहे . आता योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेली 500 मीटरची अट सुद्धा रद्द करून 150 मीटरवर आणलेली आहेत.

यापूर्वी विहिरीच्या बांधकामासाठी शेत्कार्याना 99000 हजार रुपये अनुदान दिले जायचे , आणि हळूहळू हे अनुदान 2 लाख रुपये पर्यंत गेले होते , परंतु आता या योजनेत मोठा बदल करून जो व्यक्ती ओनलाइन अर्ज किव्हा ऑफलाईन भरून विहिरीची मागणी केल्यास प्रत्येक शेतकऱ्याला विहीर देण्याची अनुमती देण्यात आलेली आहे . व हे अनुदान रक्कम वाढवून 4 लाख रुपये करण्यात आलेली आहे . या वाढीव निधीमुळे शेतकऱ्याला दिलासा देण्यात आलेला आहे.

हि योजना शेतकऱ्याला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत विहिरीची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. तसेच विहीर दिली म्हणजे झाले असे नाही , त्या विहिरीतील पाणी उपसा करण्यासाठी सरकार शक्यतो  सोलर पंप देण्याचा उल्लेख आहे .


लागणारे कागदपत्र – 

या योजनेच्या अर्ज साठी खालील कागदपत्र आवश्यक आहे .

  1. आधार कार्ड
  2. ऑनलाईन सातबारा
  3. ऑनलाईन आठ अ
  4. नकाशा
  5. चतुर्सिमा
  6. बँक पासबुक
  7. रहिवाशी दाखला
  8. मोबाईल नंबर
  9. जॉब कार्ड
  10. विहिरीचा अर्जाचा नमुना
  11. सामाईक विहीर असेल तर सामोपचाराने पाणी वापराबद्दल सर्व लाभार्थीचे करारपत्र .

मागेल त्याला विहीर योजनेसोबत इतर लाभ – 

  • या योजनेसोबत असलेली पूर्वीची 500 मीटर अंतराची अट रद्द करून ती 150  मीटर केलेली आहे.
  • विहिरीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याचा पाणीचा उपसा करण्यासाठी सोलर पंप देखील देण्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे .
  • सोबतच शेतकरी व्यक्तीला तुषार ठिंबक सिंचनाची सुविधा देखील उपलब्ध  करून देण्यात आलेली आहेत.
  • नरेगाच्या मार्फत विहिरीचे काम केले जाणार म्हणून गावातील व्यक्तींना रोजगाराची संधी मिळेल.  magel tyala vihir

ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2023; आता मिळणार 5 लाख रुपये. लेक लाडकी योजना: तुमच्या मुलीला मिळणार 75 हजार रुपये. येथे क्लिक करा .


अर्ज कसा करायचा – मागेल त्याला विहीर योजना

मागेल त्याला विहीर योजना अर्ज तुम्ही ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्ज करू शकता , तुम्ही कोणत्याही जवळच्या  आपले सरकार केंद्रात जाऊन ओनलाइन अर्ज करू शकता .तसेच जर तुम्हाला ऑफलाइन  अर्ज करायचा असेल तर  तुमच्या ग्राम पंचायतीत  ग्राम सभेच्या दिवशी सगळ्या कागद पत्रा सोबत अर्ज करू शकता . तसेच egs horticulture वर registration नक्की करा.


EGS HORTICULTURE APP registration process

आता 2023 पासुन महाराष्ट्र सरकारने EGS HORTICULTURE नावाने एक मोबाईल अप्प सुरु केले आहेत. आता या अप्प वरून लाभार्थाला त्याचा विहिरीचा अर्ज नोंदणी करावी लागणार आहेत . Registration साठी तुम्हाला 7/12 आणि 8 अ ची एकत्रित pdf बनवून ठेवावी लागेल. व जॉब कार्ड चा फोटो लागेल .

त्यासाठी google play store वर जाऊन egs horticulture app सर्च करा . व हे अप्प डाउनलोड करा.

maagel-tyala-vihir-yojana

नंतर हे अप्प ओपन करा .व लाभार्थी लॉगीन पर्याय निवडा .

egs horticulture app registration process
egs horticulture app registration process

लाभार्थी पर्याय निवडल्या नंतर विहीर अर्ज हा पर्याय निवडा .

egs horticulture app registration process

व आता अर्जदाराचा संपूर्ण तपशील जसे , नाव , मोबाईल नंबर , ई मेल आयडी, सर्वे नंबर इत्यादी भरा .7/12 आणि जॉब कार्ड ची माहिती भरा. व सोबतच 7/12 आणि 8 अ ची pdf बनवून उपलोड करा . तसेच तुम्हाला अर्जदाराचा जॉब कार्ड चा फोटो पण उपलोड करावा लागेल. तो उपलोड करा .

egs horticulture app registration process

संपूर्ण माहिती भरल्यावर पुढे जा वर क्लिक करा . आपला अर्ज सबमिट करा . तुमचा अर्ज यशस्वीपणे सबमिट झालेला आहेत.


विहीर अनुदान योजना लाभार्थी – Maagel tyala vihir yojana

खालील व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहेत .

  1. अनुसूचित जाती
  2. अनुसूचित जमाती
  3. भटक्या जमाती
  4. निर्धीसुचीत जमाती
  5. दारिद्या रेषेखालील व्यक्ती
  6. स्त्री कर्ता  असलेली कुटुंब
  7. शारीरिकदृष्ट्या विकलांग असलेले व्यक्ती कर्ता असल्यास ते कुटुंब .
  8. जमिनी सुधारक शुधारण्याचे लाभार्थी
  9. सीमांत शेतकरी , ज्याचा कडे अडीच  एकर पर्यंत जमीन आहे असे व्यक्ती.
  10. अल्पभूदारक शेतकरी, ज्याचाकडे पाच एकर पर्यंत जमीन आहे असे व्यक्ती .

मागेल त्याला विहीर योजनेसाठी पात्रता – 

  1. Maagel tyala vihir yojana साठी व्यक्तीकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असावे , म्हणजेच एक एकर अथवा 40 आर  जमीन  असावी.
  2. ज्या ठिकाणी विहीर खोदायची आहे तेथे 150 मीटर पर्यंत दुसरी विहीर नसावी . तसेच हि अट अनुसूचीत जाती व जमाती आणि दारिद्य रेषेखालील कुटुंबासाठी लागू असणार नाही . हे लक्ष्यात घ्यावे.
  3. Maagel tyala vihir yojana साठी व्यक्ती कडे ओनलाइन जमिनीची नोंद व दाखला असावा .
  4. व्यक्तीच्या सातबारा वर विहिरीची नोंद नसावी.या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यापाशी जॉब कार्ड असणे गरजेचे आहे.

लेक लाडकी योजना: तुमच्या मुलीला मिळणार 75 हजार रुपये. येथे क्लिक करा .


अटल बांधकाम कामगार घरकुल योजना 2023 ( ग्रामीण ) | 1 लाख 50 हजार अनुदान | atal bandhkam kamgar gharkul yojana 2023 असा करा अर्ज |


FAQ.


  1. मागेल त्याला विहीर योजनेचे अनुदान किती ?

उत्तर -Maagel tyala vihir yojana  या योजनेत 4 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहेत.


2 . मागेल त्याला विहीर योजनेत किमान किती जमीन हमी ?

उत्तर -Maagel tyala vihir yojana  या योजनेसाठी किमान सलग एक एकर जमीन पाहिजे.


3 . मागेल त्याला विहीर योजनेत दुसरी विहिरीचे अंतर ची अट आहे का ?

उत्तर -Maagel tyala vihir yojana या योजनेत पूर्वीची 500 मीटरची अट रद्द करून 150 मीटर अंतराची अट ठेवलेली आहेत.


4. व्यक्ती कडे ओनलाइन जमिनीची नोंद असणे आवश्यक आहे काय ?

उत्तर – होय मागेल त्याला विहीर योजनेत व्यक्ती कडे ओनलाइन जमिनीची नोंद असणे आवश्यक आहे .


5.  मागेल त्याला विहीर योजनेचा अर्ज कसा करायचा ?

उत्तर- Maagel tyala vihir yojana या योजनेसाठी तुम्ही ओनलाइन अथवा ऑफलाइन अर्ज ग्राम पंचायतीत करू शकता.


6. मागेल त्याला विहित योजनेत पूर्वी किती अनुदान मिळायचे ?

उत्तर- Maagel tyala vihir yojana  या योजनेत पूर्वी 2 लाखा पर्यंत अनुदान मिळायचे .


 लेक लाडकी योजना:

तुमच्या मुलीला मिळणार 75 हजार रुपये. येथे क्लिक करा .


महाराष्ट्र पिक विमा

यादी 2023 जिल्हा नुसार जाहीर | किती जिल्हे पात्र ?


महाडीबीटी शेतकरी सर्व योजना 2023 | ट्रैक्टर, पेरणी यंत्र , पंपसेट, इत्यादी सर्व योजना | mahadbt shetkari yojana 2023 | योजनेचे लाभ , अनुदान , अर्ज प्रक्रिया , पात्रता सर्व माहिती मराठी.



तुमच्या मित्रांना पाठवा -
8 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *