pm aavas yojana 2023 | घरकुल योजनेच्या नियमात झाला मोठा बदल | सरपंच व ग्रामसेवकचे हे अधिकार CEO ने काढले. अर्ज कसा करायचा, लाभ किती , संपूर्ण मराठी माहिती .

sarkarisamrat.com
7 Min Read
तुमच्या मित्रांना पाठवा -

pm aavas yojana 2023  | घरकुल योजनेच्या नियमात झला मोठा बदल | ( असा करा अर्ज , पहा नवे नियम , यादी पहा ) (सरपंच व ग्रामसेवकचे हे अधिकार काढले )


pm aavas yojana 2023 –

नमस्कार मित्रांनो , स्वताचे पक्के घर हे प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते , व हे स्वप्न पूर्ण करण्याचे काम घरकुल योजना करीत असते.  सामान्य व आर्थिक दुष्ट्या गरीब व्यक्ती अति उत्साहाने या योजनेची वाट पाहत असते . आपल्याला या योजनेचा लाभ मिळेल आपण पण एक चांगले घर बांधू हे स्वप्न ठेऊन सामान्य व्यक्ती वाट पाहत असते .

परंतु आता घरकुल यादीत  व्यक्तीचे नाव येऊनही काही वेळा माहितीच्या अभावी किव्हा जागेच्या कमतरते मुळे हा लाभ आपल्याला मिळता मिळता राहून जाते. जणू तोंडापाशी आलेला घास निघून गेला . या प्रकरणाची दखल घेऊन राज्य शासनाने घरकुल योजनेत काही महत्वाचे बदल केलेले आहे .

या बदलामुळे सरपंच व ग्रामसेवक यांचे काही अधिकार कडून घेतले आहेत . तर काय आहे ते बदल ? व काय आहे नवे नियम ? हे आपण या लेखात पाहणार आहोत त्यामुळे हा लेख आपण शेवट पर्यंत वाचा .


घरकुल योजनेचे जुने नियम –

मित्रांनो , घरकुल योजनेत आधी सरपंच व ग्रामसेवक यांना खूप महत्वाचे अधिकार होते , त्यातीलच एक अधिकार म्हणजे शासकीय योजनेत घरकुल बांधण्यासाठी स्वता:ची जागा नसलेल्या ग्रामस्थाला ग्रामपंचायत गावठाण ची जागा देण्याचे अधिकार सरपंच व ग्रामसेवक यांना होते . या अधिकारामुळे काही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात घोटाळे होत होते.

हे लक्षात घेऊन सरपंच व ग्रामसेवक यांचे हे अधिकार काढून घेण्यात आलेले आहेत . कोणतेही ग्रामस्थ या pm aavas yojana 2023 योजनेतून वंचित राहू नये असे राज्य शासनाचे ध्येय आहे.


घरकुल योजनेचे नवे बदल -( pm aavas yojana 2023 )

ग्रामीण भागात पंडील दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजना , रमाई आवास योजना , प्रधान मंत्री आवास योजना इत्यादी राबवण्यात येत आहे . या योजनेचा लाभ घेण्यासाठी एकतर स्वताच्या जागेवर घर बांधावे लागतात अथवा सरपंच आणि ग्रामसेवक गावठाण ची जागा देत होते .

परंतु गावठाण ची जागा देण्याचे अधिकार सरपंच व ग्रामसेवक यांना राहिलेले नाहीत . आता हे अधिकार जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वताकडे घेतले आहेत . त्यामुळे या नंतर मुख्य कार्यकारी अधिकारी लाभार्थी  व्यक्तीला घरकुल बांधण्यासाठी गावठाण ची जागा देणार . व हे जागा मिळवण्यासाठी गट विकास अधिकारी यांचा अध्यक्षतेखाली समितीने जागा देण्या संदर्भात शिफारस मुख्य कार्यकारी अधिकारीला करावे लागणार आहे. व त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने pm aavas yojana 2023 साठी हि जागा मिळेल .


 – ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2023; आता मिळणार 5 लाख रुपये.

 – लेक लाडकी योजना: तुमच्या मुलीला मिळणार 75 हजार रुपये. येथे क्लिक करा .

– नमो शेतकरी योजना ; या तारखेला येणार पहिला हप्ता 2 हजार रुपये . येथे क्लिक करा .


योजनेत का बर बदल केला ?

घरकुल योजनेच्या ( gharkul yojana 2023) माद्यमातून स्वताची जागा नसलेल्या व्यक्तीला जागा खरेदी साठी  अर्थसाहाय केले जाते ,  व सरपंच व ग्रामसेवक हि  जागा सुचवत होते, जेणेकरून घरकुल योजनेचे लाभार्थी तेथे योजनेचे घर बांधू शकेल . आणि नियम व निकषा नुसार व्यक्तींनी त्या जागेवरच घर बांधणे अनिवार्य आहेत .

परंतु भविष्यात त्या सुचवलेल्या जागेसाठी वादही निर्माण होत आलेला आहे, अश्या परिस्थितीत जागेचा वादही मिटत नाही व, घरकुल पूर्ण होत नाही. त्यामुळे सरकारचे खूप मोठे नुकसान होते आलेले आहेत. व लाभार्थी पण या pm aavas yojana 2023 घरकुल योजनेचा योग्य तो लाभ घेऊ शकत नाही.

त्यामुळे या नंतर लाभार्थीचे नुकसान होऊ नयेत , व घरकुल योजनेचा योग्य लाभ घेता यावा , यासाठी हे नवे नियम करण्यात आलेले आहेत.


घरकुल योजने बद्दल माहिती –

सद्या भारतात व आपल्या महाराष्ट्रात दोन महत्वाच्या घरकुल योजना सुरु आहेत . आपण त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.

1.प्रधानमंत्री आवास योजना (pm aavas yojana 2023 )-

प्रधान मंत्री  आवास योजना हि भारतातील सद्याची सर्वात मोठी व महत्वाची घरकुल योजना आहेत . हि योजना 2015 साली सुरु करण्यात आली . या योजनेचा उद्देश सर्वांसाठी परवडणारी घरे हा आहे  . आर्थिक दुष्ट्या मागास व गरीब व्यक्तींना अर्थसहाय्य करून त्यांच्या स्वप्नाचे घर बांधण्यात मदत करणे हा उद्देश व ध्येय सरकारचे आहे.  हि योजना शहरी व ग्रामीण अश्या दोन्ही ठिकाणी सुरु आहेत . ग्रामीण साठी 1.2. लाख रुपये मदत अनुदान व शहरी साठी 2.5 लाख रुपये मदत अनुदान देण्यात येते . या योजनेचा लाभ आर्थिक दुष्ट्या गरीब व निम्य आय गट घेऊ शकते.

2. रमाई आवास योजना –

हि योजना महाराष्ट्रात राज्य शासनाद्व्यारे सुरु करण्यात  आली आहेत . हि योजना मुख्यतः बिपियल व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नवबुद्द्यः जातीसाठी लागू आह्रेत ,  योजने मार्फत या गटाला घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य करण्यात येते . या योजनेत मुख्यतः गरीब , विधवा महिला, अपंग यांना प्राधान्य दिले जाते . या योजनेत सर्व साधारण क्षेत्रासाठी घरे बांधण्यासाठी 1.3 लाख रुपये अनुदान दिले जाते . व शहरी भागात घरे बांधण्यासाठी 2.5. लाख रुपयाची आर्थिक मदत केली जाते.


 ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2023; आता मिळणार 5 लाख रुपये.


 

 लेक लाडकी योजना: तुमच्या मुलीला मिळणार 75 हजार रुपये. येथे क्लिक करा .


महाराष्ट्र पिक विमा यादी 2023 जिल्हा नुसार जाहीर | किती जिल्हे पात्र ?

 


अर्ज करण्याची पद्दत – 

1.  प्रधान मंत्री आवास योजना – (pm aavas yojana 2023 )

तुम्ही ओनलाइन अथवा ऑफलाईन ग्रामपंचायत मध्ये  pm aavas yojana 2023  साठी कर्ज करू शकता .

अधिकृत वेबसाईट –

ग्रामीण -https://pmayg.nic.in/netiayHome/home.aspx

शहरी-  https://pmaymis.gov.in/

2.  रमाई आवास योजना

तुम्ही ओनलाइन अथवा ऑफलाईन ग्रामपंचायत मध्ये  कर्ज करू शकता .

अधिकृत वेबसाईट – https://sjsa.maharashtra.gov.in/en/ramai-awas-gharkul-scheme-sc-nav-buddha-urban-and-rural


 

महाराष्ट्र पिक विमा यादी 2023 जिल्हा नुसार जाहीर | किती जिल्हे पात्र ?


FAQ.


  1. कोणते नवीन नियम लागू केले?     उत्तर — आता योजनेसाठी गावठाण ची जागा मुख्य कार्यकारी अधिकारी देणार. सरपंच व ग्रामसेवकाचे हे अधिकार काढून घेतले आहेत.

  2. प्रधानमंत्री आवास योजना कधी सुरु झाली.  उत्तर — हि योजना 2015 साली सुरु झाली.

– लेक लाडकी योजना: तुमच्या मुलीला मिळणार 75 हजार रुपये. येथे क्लिक करा .


– नमो शेतकरी योजना ; या तारखेला येणार पहिला हप्ता 2 हजार रुपये . येथे क्लिक करा .


– ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2023; आता मिळणार 5 लाख रुपये.


 – राज्य सरकार जमीन घेणार भाड्याने : एका एकरासाठी 75 हजार मिळणार.


 


 


तुमच्या मित्रांना पाठवा -
1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *