कापसाचे भाव यंदा खरंच वाढणार का ? यावर्षी कापूस कधी विकायला पाहिजे ? कापसाची सद्याची आवक व भाव (cotton prices futures 2023 )
कापूस बाजारात सद्या वेगवेगळ्या चर्चा आहेत , कि यंदा पण कापसाचे भाव वाढणार नाहीत , उद्योग तोट्यात जात असल्यामुळे कापसाला मागणी राहणार नाहीत. त्यामुळे या वर्षीच्या सुरुवातीला बाजारात भाव कमी मिळत आहेत . तर या सर्व चर्चा खऱ्या आहेत का ? खरच या वर्षी पण कापसाचे भाव वाढणार नाहीत का ? हे आपण जाणून घेऊया कापसाचे भाव 2023 या लेखात.
बघा या चर्चा बाजारात प्रत्येक वर्षीच पसरवल्या जातात . या वर्षी नक्कीच भाव वाढण्याचे काही कारण आहेत.
या वर्षी कापूस बाजार भाव मागच्या वर्षी प्रमाणे शांत राहणार नाहीत , कापसाचे भाव वाढण्याला कारण खाली आहेत.
कापसाचे उत्पादन घट ( मुख्य कारण)–
कापसाला यावर्षी भाव मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे या वर्षी भारतात व इतर प्रमुख कापूस उत्पादन देश जसे अमेरिका आणि चीन येथे कापसाच्या उत्पादनात घट दिसून आलेली आहेत. त्यामुळे जागतिक कापूस टंचाई भासण्याचे बोलले जात आहेत . उत्पादन घट असल्यामुळे कापसाची मागणी वाढून भाव वाढ होण्याची शक्यता आहेत.
चीन हा देश अमेरिके कडून कापूस आयात करतो पण या वर्षी अमेरिकेतच कापसाचे उत्पादन कमी आहेत. भारत ,चीन आणि अमेरिका हे देश मुख्य कापसाचे उत्पादन घेणारे देश आहेत. आणि बाकी देश खूप कमी प्रमाणात कापूस चे उत्पादन घेतात .
भारतात कापसाचे उत्पादन कमी असल्यामुळे भारताला ब्राजिल या देशातून कापूस आयात करावा लागणार आहेत. परंतु ब्राजिल तितक्या प्रमाणात पुरवठा कमी शकणार नाहीत. त्यामुळे कापसाचा तुटवढा भासून मागणी वाढेल व त्यामुळे कापसाची भाववाढ होण्याची दाट शक्यता आहेत. मागच्या वर्षी भारताचे कापूस भाव जागतिक भावापेक्षा कमी होते. परंतु या वर्षी जागतिक बाजारभाव भारतीय कापूस बाजार भावापेक्ष्या जास्त आहेत.तसेच या वर्षी कापसाचा वापर पण जास्त दिसून येत आहेत. cotton futures prices
कापसाची सद्याची आवक व भाव –
मागच्या वर्षी भारताचे कापूस भाव जागतिक भावापेक्षा कमी होते. मागच्या वर्षी शेतकऱ्याला पाहिजे तसा भाव मिळाला नाहीत . त्यामुळे शेतकरी मिळेल त्या भावात येणाऱ्या दोन महिन्यात कापूस विकणार. सद्या पण बाजारात उत्पादन पेक्षा आवक जास्त दिसून आलेली आहेत. काही शेतकरी मागील वर्षीचा कापूस पण बाजारात आणत आहेत. मागच्या वर्षी भारताचे कापूस भाव जागतिक भावापेक्षा कमी होते. परंतु या वर्षी जागतिक बाजारभाव भारतीय कापूस बाजार भावापेक्ष्या जास्त आहेत.
येणारी दिवाळी आणि सोयाबीन व इतर पिकाचे होणारे कमी उत्पादन मुळे शेतकरी पैसा नसल्यामुळे कापूस विकणार . व येणाऱ्या 1 ते दीड महिन्यात 80% कापूस बाजारात येणार . बाजारात आलेला कापूस आवश्यकते पेक्ष्या कमी असणार. व उद्योगाला कापूस आयात करण्याची गरज भासणार असे तज्ञाचे मत आहेत. व उद्योग सरकारला आयात करण्याबद्दल कळवणार.
आणि आता आयात करावी मटले तर जागतिक कापूस उत्पादन कमी आहेत म्हणून भाववाढ होण्याची शक्यता आहे. cotton prices 2023
कापूस भाव कधी वाढणार ?
सद्याची परिस्तिथी पाहता जानेवारी महिन्यात भाववाढ होऊ शकते . व कापुस उत्पादन आणि कापूस घट या बद्दल उद्योग आणि सरकारला अंदाज येउन जाईल . त्या नंतर जानेवारी व फेब्रुवारी मध्ये भाववाढ दिसण्याचे मटले जाते . या वर्षी जागतिक कापूस बाजारभाव भारतीय कापूस बाजार भावापेक्ष्या जास्त असल्यामुळे भाव वाढणार असे मटले जात आहेत. cotton prices india
कापूस कधी विकावा ?
या वर्षी सगळेच पिक उत्पादन जसे सोयाबीन व इतर कमी झालेले आहेत. त्यामुळे पैशाच्या गरजेपुरता कापूस सद्या विकून जानेवारीत भारतातच नाही तर जागतिक भाववाढ होण्याची वाट पाहू शकता . किंवा अर्धा कापूस आधी आणि अर्धा कापूस नंतर विकून , कमी आणि जास्त असा दोन्ही भाव मिळण्याची वाट पहा.
परंतु सगळा कापूस आताच येणाऱ्या दोन महिन्यात विकणे काही योग्य दिसत नाहीत. उत्पादनात झालेल्या घट मुळे आपण मागील वर्षी प्रमाणे काही दिवस भाववाढ होण्याची वाट पाहू शकतो. cotton prices futures 2023
महत्वाचे – शेतकर्याने जास्तीत जास्त कापूस बाजारात आणावा , व कमी भावात शेतमाल कापूस विकावा म्हणून , बाजारात काही चुकीची माहिती सोडली जाते . जसे या वर्षी मंदी मुळे भाव वाढणार नाहीत , उद्योग तोट्यात गेल्यामुळे उद्योग बंद होत आहेत. त्यामुळे मागणी वाढणार नाहीत .अश्या माहितीचा उद्देश एकच असतो तो म्हणजे कमी भावात शेतकर्याने शेतमाल कापूस विकावा. कृपया स्व:ताचा बुद्धीने या गोष्टीवर विचार करावा.
शेतकर्याने बाजार आणि शेतमाल विकण्याचा योग्य निर्णय घ्यावा हाच घेतु या लेखचा आहेत . आता बाजार तर आपल्या हातात नाहीत परंतु आपल्या कापूस व शेतमालाचे वेगवेगळे टप्पे करून शेतमाल बाजारात नेणे योग्य ठरेल.
शेतकरी मागील वर्षी कमी भाव मिळाल्यामुळे या वर्षी नाराज होऊन कोणत्याही भावात कापूस विकू नयेत म्हणून हा लेख लिहिलेला आहेत. cotton market rate
उत्पादन ( कापसाचे ) | भारतात व जागतिक उत्पादन कमी आहेत. |
वर्ष | 2023-24 |
भाववाढ ची शक्यता | जानेवारी व नंतर |
कापूस कधी विकावा ? | टप्पे वारीत कापूस विकावा , भाववाढीची शक्यता आहेत. |