kiwi farming marathi : किवी फळाची शेती कशी करतात ?, महाराष्ट्रात किवी फळाची शेती होऊ शकते का ? किवी फळाला इतकी मागणी का आहेत , महाराष्ट्रात किवि फळाची लागवड करता येणार का ? जाणून घ्या .
जगभरात किवी या फळाची प्रचंड मागणी वाढत जात आहेत, किविला गेल्या 3 वर्षात नागरिकांची पसंती मिळाली आहेत. किवी या फळाला सेंद्रिय प्रमाणपत्राची गरज होती ती 2020 रोजी मिळाली . व फळाला लोकमान्यता दर्जा मिळाला आहेत.
किवी फळ खाल्याने फायदे व त्याचा आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणामामुळे याची मागणी वाढत आहेत , तर शेतकर्याने या फलाबद्दल माहिती घेऊन याची लागवड केल्यास शेतकऱ्याला चांगला नफा होऊ शकते .
तर किवी फळाची शेती कशी करतात ? किवी फळाच्या शेतीतून किती नफा मिळू शकते ? किवीचे फायदे कोणते? इत्यादी प्रश्नाची उत्तरे आपण या लेखात पाहणार आहेत तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा .

किवि फळाच्या इतिहास –
किवी फळ हे अरुणाचल प्रदेशातील जीरो घाटी जंगलात गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून लोकांच्या नजरेत आले , परंतु त्यावर जास्त लक्ष्य दिले गेले नाहीत . परंतु हळू हळू सन 2000 पासुन हे किवी हे फळ बाजारात उपलब्ध झाले .
आता 2020 पासुन त्याला सेंद्रिय फळाचा दर्जा प्राप्त झाला . किविला हा दर्जा प्राप्त व्हावा म्हणून अरुणाचल प्रदेशातील शेतकरी व यांनी खूप मेहनत घेतलेली आहेत.
किवी फळाचे झाड कसे असतात ?
किवी हे फळ अंगूर प्रमाणे वेलेवर लागतात . किवी फळाच्या वेली कठोर असतात . किवी फळाची वेल शेतात ताराच्या सहायाने तरंगत असते . या वेलेवर आधी खालचे व नंतर वरचे असे फळ पिकतात .
वेलेवरचे किवी चे फळ तोडून त्याला कपड्याने स्वच्छ केले जाते आणि हे सुरुवातीला कठोर असणारे फळ बाजारात पोहचवले जाते . नंतर 12 ते 14 दिवसांनी हे फळ नरम बनतात व खाण्यायोग्य बनतात.

किवी फळाची लागवड कशी करतात ?
किवी फळाच्या वेलीला आधार द्यावे लागते त्यामुळे , किवीची लागवड करण्यासाठी प्रशिक्षण गरजेचे आहेत. या वेली लागवडीसाठी 2 प्रकारच्या आधारभूत संरचना तयार करता येते .
1 एकल वायर संरचना –
या प्रकारात खांब व वायर यांचे सरळ कुंपण बांधले जाते .
2 मीटर लांबीचे खांब ( लाकूड , लोखंड, क्रांक्रीत चे ) 6 मीटरच्या अंतरावर सरळ रेखेत गाडले जाते व त्यावर 2.5 मिमी जाड तार बांधले जाते . तार बांधताना ताराला जास्त ताण नसावा कारण वेलेच्या वजनाने तार तुटू शकते.
2 अंगूर प्रमाणे डब्बा संरचना –
ज्या प्रमाणे अंगूर चे बगीचे हे खांब व तार यांचा वापर करून सरळ व आडवे असे दोन्ही प्रमाणात तार बांधून डब्बा तयार करतात , त्याचप्रमाणे किवी फळाला पण या पद्धतीने आपण लावू शकतो .
या संरचना ( कुंपण ) तयार केल्या नंतर किवी चे बीज सरळ रेखेत असणार्या खांबाचा खाली लावले जाते .
प्रत्येक 10 झाडामध्ये 9 झाड मादा व 1 झाड नर या प्रमाणात लागवड करावी लागते.
किवी ला लागणारा सुरुवातीचा खर्च जास्त आहेत , पण या फळातून उत्पन्न सुद्धा अधिक मिळते , जे तुम्हाला फायद्यात सोडते . kiwi farming marathi


किवी फळाची किंमत आणि बाजारभाव –
एका किवी फळाची किंमत बाजारात 40 ते 50 रुपये आहेत . एका हेक्टर शेतीत किविचे दरवर्षी 10 ते 25 लाख रुपये उत्पन्न निघते. किवी फळाला त्यांचा वजन प्रमाणे वर्गीकृत केलेले आहेत. 70 ग्राम वजन असणारे A ग्रेड व 40 ते 70 ग्राम वजन असणारे B ग्रेड असे आहेत.

मित्रा ते.. अमेरिकेत कापसाची शेती कशी केली जाते ?
माती , जमीन कशी असावी ? किवी लागवडीसाठी –
पाण्याचा चांगला निचरा होणारी सुपीक माती आणि पिवळसर तपकिरी चिकण मातीत किवी चे योग्य उत्पादन घेता येते. तसेच मातीत वर्षभर पुरेसा ओलावा ठेवावा लागतो. तसेच मातीचा पीएच 5 ते 7 असावा लागतो .
वेल लागवडी नंतर नियमित मातीत नायट्रोजन आणि फोस्फारस ची आवश्यकता असते . ते आपण खतांचा साहायाने पूर्ण करू शकतो .
किवीच्या भारतीय जाती-
भारतातील किवी फळांच्या मुख्य जाती अलीसन , ब्रुनो, हेवर्ड, मॉन्टी, अबॉट, अलिसन आणि टोमुरी या आहेत.
किवीचे कुठे कुठे आणि किती उत्पादन होते ?
किवी या फळाचे भारतात अरुणाचल प्रदेशात सर्वाधिक वर्षाला 8 हजार मेट्रिक टन उत्पादन घेतले जाते .
व इतर भारतात हिमाचल प्रदेश , उत्तर प्रदेश , जम्मू व काश्मीर , सिक्कीम , मेघालय आणि केरळ या ठिकाणी याची शेती केल्या जाते .
तसेच किवी या फळाला न्युझीलंड , इटली , अमेरिका व चीन आणि जपान या देशात व्यापक स्वरुपात उगवल्या जाते. kiwi farming marathi

किवी फळाला पिकण्यासाठी लागणारा वेळ –
किवी जे फळ त्याचा वेलेला 3 ते 4 वर्षात लागणे सुरु होते व नंतर 5 ते 6 वर्षाने आपण त्याची बाजारपेठ मध्ये विकण्यास सुरुवात करू शकतो .
हे फळ साधारणपणे फेब्रुवारी मध्ये येतात व ऑक्टोबरमध्ये पूर्ण पिकून तोडायला तयार होतात.
या 5 ते 6 वर्षात किवी फळाच्या झाडामध्ये असणार्या अंतरात आपण आंतरपीक घेऊ शकतो. त्यामुळे 6 वर्ष फक्त किवी पिकाची जास्तीचे उत्पन्न साठी म्हणून वाट पहावी लागते .

अच्छा ! हे आहेत आधुनिक शेतीचे 5 वेगवेगळे प्रकार.
किवी चे उत्पादन घेण्यासाठी वातावरण कसे असावे ?
किवित अनेक औषधीय गुणधर्म आहेत , त्यामुळे वातावरण आणि जलवायू यासाठी खूप महत्वाचे ठरते . या फळाची लागवड व शेती साठी थंड वातावरण आवश्यक असते , 7 ते 22 डिग्री सेल्सिअस असणारे वातावरण या पिकासाठी पाहिजे असते .
परंतु जेथे 30 अंश सेल्सिअस च्या वरती वातावर जात नाही अश्या ठिकाणी पण किवीची शेती यशस्वी झालेली आहेत. अश्या थंड ठिकाणी किवी फळाची लागवड आपण करू शकतो .

महाराष्ट्रात किवी फळाची शेती होऊ शकते का ?
या पिकाचा बारीक अभ्यास केल्यास , किवी या फळाला फक्त फळ धारणे साठी 7 ते 10 अंश सेल्सिअस तापमान असणे अति महत्वाचे आहेत . परतू हे 10 डिग्री पर्यंतचे तापमान फक्त 150 ते 200 तास असणे गरजेचे आहेत.
हे फळ साधारणपणे फेब्रुवारी मध्ये येतात व ऑक्टोबरमध्ये पूर्ण पिकून तोडायला तयार होतात. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी याची शेती करू शकतात .
मांढरदेवी या महाराष्ट्रातील ठिकाणी एका शेतकर्याने किवीची यशस्वी लागवड केली आहेत. आणि पिक घेतलेले आहेत.
त्यामुळे महाराष्ट्रातील काही ठिकाणी आपण किवी ची शेती करू शकतो हे सिद्ध होते.


मित्रा ते.. अमेरिकेत कापसाची शेती कशी केली जाते ?
अरे ! सुगंधी वनस्पतीची 5 आधुनिक पिके |
एक लिटर तेलाची किंमत 15 हजार रुपये..