दुसर्या टप्प्याचा दुष्काळ 1021 मंडळात जाहीर. GR आला पहा. ( drought maharastra update GR ) दुष्काळग्रस्तांना मिळणारी सुविधा व सवलती.
महाराष्ट्रात काही दिवस पूर्वी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर केलेला होता . त्या व्यतिरिक्त आता आणखी महाराष्टातील 1021 महसुली मंडळात दुष्काळ सदुष्य परिस्थिती जाहीर करण्यात आलेली आहेत. या सर्व ठिकाणी दुष्काळग्रस्तांना लागू होणार्या सर्व सवलती देण्यात येणार आहेत.
असा शासन निर्णय 9 नोव्हेंबर च्या बैठकीत घेण्यात आला असून . 10 नोव्हेंबर 2023 रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहेत. हा शासन निर्णय महसूल व वन विभाग मार्फत जाहीर केलेला आहेत.
या शासन निर्णय प्रमाणे राज्यातील दुष्काळग्रस्त 1021 मंडळात काही सवलती देण्यात येणार आहेत.
दुष्काळग्रस्तांना मिळणारी सुविधा व सवलती
सुविधा | माहिती |
---|---|
जमीन महसूल | घट |
पीक कर्ज | पुनर्गठन, वसुलीस स्थगिती |
कृषी पंप | वीजबिलात सूट |
शाळा-कॉलेज शुल्क | माफी |
रोहयो | कामाच्या निकषात शिथिलता |
पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी | टँकर्सचा वापर |
वीज जोडणी | खंडित न करणे |
शासन निर्णयात नमूद केलेले अतिरिक्त माहिती
- या सवलती 1021 महसुली मंडळांमध्ये लागू करण्यात येणार आहेत.
- दुष्काळ कालावधीत संपूर्ण उपाययोजना तातडीने करण्यासाठी सर्व अधिकार दुष्काळ समितीला देण्यात आलेले आहेत.
crop insurance 2023 | महाराष्ट्र पिक विमा यादी 2023 जिल्हा नुसार जाहीर | किती जिल्हे पात्र ? , किती मिळणार भरपाई ? संपूर्ण मराठी माहिती |