शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2023 | मिळणार 2 लाख 21 हजार रुपये | sharad pawar gramsamriddhi yojana 2023 | असा करा अर्ज |

sarkarisamrat.com
8 Min Read
तुमच्या मित्रांना पाठवा -

sharad pawar gramsamriddhi yojana  2023 | शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2023 | मिळणार 2 लाख 21 हजार रुपये | असा करा अर्ज | (पात्रता , अर्ज प्रकिया, अनुदान )


नमस्कार मित्रांनो, भारत सरकार ज्या प्रमाणे शेतकऱ्यांसाठी सामान्य नागरिकांसाठी  वेळोवेळी नवनवीन योजना आणत असतात . तसेच राज्य सरकार आपआपल्या राज्यासाठी नवनवीन योजना घेऊन येत असतात. त्यातलीच एक महाराष्ट्र राज्याने आणलेली योजना म्हणजे शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2023 आहे . हि योजना ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांच्या अतिशय फायद्याची आहे.

या योजनेत ग्रामीण भागातल्या व्यक्तीला 4 विशेष योजनाचे लाभ घेता येणार आहे . हि योजना मुखःतह शेड उभारणे , व पशु पालनाला प्रोत्साहन देण्याच्या संदर्भात आहे. तर अर्ज कुठे करायचा ? योजनेचा नेमका लाभ काय ? योजनेसाठी पात्रता काय आहे ? इत्यादी प्रश्नाचे उत्तर आपण या लेखात पाहणार आहे . त्यामुळे हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा .


योजनेचे स्वरूप –

sharad pawar gramsamriddhi yojana 2023 मार्फत आपण 4 वेगवेगळ्या प्रकारचे लाभ घेऊ शकतो . हि योजना 2021 मध्ये सुरु करण्यात आलेली होती आणि हिला आता वेग आलेला आहे, योजनेची  सर्व कामे तातडीने केली जात आहे .  तर ते 4 प्रकारचे लाभ खाली दिलेले आहेत.

  1. गाय – म्हैस पालन शेड बांधकाम योजना
  2. शेळी पालन शेड बांधकाम योजना .
  3. कुक्कुट पालन शेड  बांधकाम योजना
  4. नाडेप कम्पोस्टिंग योजना

हि योजना महात्मा गांधी रोजगार हमी योजने  मार्फत पूर्ण करण्यात येणार आहे.


योजनेचे अनुदान –

1. गाय – म्हैस पालन शेड बांधकाम योजना-

sharad pawar gramsamriddhi yojana 2023 मार्फत गाय व म्हैस यांचा गोठा बांधकामासाठी 77 हजार रुपये मिळणार आहेत. परंतु जर गाय अथवा म्हैस यांची संख्या 6 ते 12 असेल तर अनुदान दुप्पट मिळणार आहेत , म्हणजेच 1 लाख 44 हजार रुपये. जाऊ शकते , तसेच जर गुरांची संख्या 12 ते 18 असेल तर अनुदानाची रक्कम तिप्पट मिळणार आहे , म्हणजेच 2 लाख 21 हजार रुपये पर्यंत  अनुदान मिळू शकते.

2 ते 6 गुरांसाठी                          77 हजार रुपये अनुदान

6 ते 12 गुरांसाठी                        1 लाख 44 हजार रुपये अनुदान

12 ते 18 गुरांसाठी                       2 लाख 21 हजार रुपये अनुदान


2.  शेळी पालन शेड बांधकाम योजना –

sharad pawar gramsamriddhi yojana 2023 मार्फत शेळी पालन शेड बांधकाम करण्यासाठी 2 ते 10 शेळी असल्यास 49 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहेत . जर 10 ते 20 शेळी असल्यास अनुदानाची रक्कम दुप्पट करण्यात येणार आहेत. म्हणजेच 98 हजार रुपये देण्यात येईल . असेच शेळी ची संख्या 30 च्या वर असेल तर अनुदानाची रक्कम तिप्पट करण्यात येणार आहेत . म्हणजेच 30 शेळी असल्यास 1 लाख 47 हजार रुपये अनुदान मिळू शकणार .

2 ते 10 शेळी                               49 हजार अनुदान

10 ते 20 शेळी                             98 हजार रुपये अनुदान

30 च्या वर शेळी                          1 लाख 47 हजार रुपये अनुदान


3. कुक्कुट पालन शेड बांधकाम योजना –

sharad pawar gramsamriddhi yojana 2023 मार्फत कुक्कुट पालन योजनेसाठी उभारणे साठी अनुदान दिले जाणार आहेत . हे अनुदान 99 कुक्कुट पक्ष्यासाठी मिळणार आहेत .  जर पक्षी जास्त असेल तर शेड उभारण्यासाठी जास्त अनुदान दिले जाणार  आहेत.  99 पक्ष्यांच्या शेड साठी 49 हजार रुपये दिले जाणार आहेत.


4. नाडेप कम्पोस्टिंग योजना –

महाराष्ट्रात भू संजीवनी नाडेप कम्पोस्टिंग योजने अंतर्गत शेतीसाठी व इतर गोष्टीसाठी कंपोस्ट खात तयार केले जात आहेत, कंपोस्ट खात मातीची उगवण क्षमता वाढवते. व हे कंपोस्ट तयार करण्यासाठी कंपोस्ट युनिट तयार केले जाते , या युनिट मध्ये शेतातील कचरा टाकला जातो व त्याचे रुपांतर काही दिवसांनी कंपोस्ट खातात होते . हे कंपोस्ट युनिट तयार करण्यासाठी अनुदान दिले जात आहेत. हे अनुदान 10 हजार रुपये पर्यंत sharad pawar gramsamriddhi yojana 2023 या योजने मार्फत दिले जाणार आहेत.


अर्ज कसा करायचा – sharad pawar gramsamriddhi yojana 2023

या sharad pawar gramsamriddhi yojana 2023 योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने ग्राम पंचायत मध्ये अर्ज करायचा आहेत.

यासाठी एक लिखित/ विहित  नमुन्याचा अर्ज सादर  करायचा आहेत. ( अर्ज खाली लिंक मध्ये दिलेला आहे , डाउनलोड करा. )

अर्ज व लागणारी सर्व कागदपत्र जोडून अर्ज भरून ग्राम पंचायत मध्ये सादर करायचा आहेत. अर्ज सादर केल्यानंतर पोच पावती मिळेल. आता तुम्ही योजनेसाठी तयार आहेत.

टीप – लाभार्थीचे जॉब कार्ड असणे अतिशय महत्वाचे आहेत.


अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा


शरद पवार ग्राम समृद्धी योजना GR जीआर पहा  येथे .


ट्रैक्टर अनुदान योजना; 

 मिळणार 50% अनुदान | असा करा अर्ज.. संपूर्ण मराठी


लागणारी कागदपत्र –

  1. अर्ज    ( डाउनलोड करा . वर  दिलेला आहेत. )
  2. आधार कार्ड
  3. जॉब कार्ड
  4. सात बारा ( असेल तर )
  5. ग्राम पंचायत मालमत्ता नमुना आठ 8 उतारा
  6. राशन कार्ड
  7. जातीचा दाखला ( असेल तर )
  8. अर्जदार हा ग्रामीण भागात राहणारा असावा तसेच त्याचा व्यवसाय हा शेती असावा.
  9. रहिवासी दाखला.
  10. मोबाइल क्रमांक.
  11. उत्पन्नाचा दाखला.

  1.  ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2023;

  2. आता मिळणार 5 लाख रुपये.


     लेक लाडकी योजना:

  3. तुमच्या मुलीला मिळणार 75 हजार रुपये. येथे क्लिक करा .


    महाराष्ट्र पिक विमा यादी

  4. 2023 जिल्हा नुसार जाहीर | किती जिल्हे पात्र ?


– नमो शेतकरी योजना ;

या तारखेला येणार पहिला हप्ता 2 हजार रुपये . येथे क्लिक करा .


FAQ-

  1. शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2023 मध्ये अनुदान किती मिळणार ?

उत्तर – 2 लाख 21 हजार रुपये पर्यंत  अनुदान मिळू शकते.


2. या योजनेत कोणकोणत्या काय लाभ मिळू शकते ?

उत्तर  – sharad pawar gramsamriddhi yojana 2023 या योजनेत  4 प्रकारचे लाभ खाली दिलेले आहेत.

  1. गाय – म्हैस पालन शेड बांधकाम योजना अनुदान .
  2. शेळी पालन शेड बांधकाम योजना अनुदान .
  3. कुक्कुट पालन शेड  बांधकाम योजना अनुदान .

4.नाडेप कम्पोस्टिंग योजना अनुदान .


3. हि योजना कोणत्या गोष्टीला प्रोत्साहन देते .

उत्तर – हि योजना पशु पालनाला प्रोत्साहन देते. sharad pawar gramsamriddhi yojana 2023



  1.  ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2023;

  2. आता मिळणार 5 लाख रुपये.


     लेक लाडकी योजना:

  3. तुमच्या मुलीला मिळणार 75 हजार रुपये. येथे क्लिक करा .


    महाराष्ट्र पिक विमा यादी

  4. 2023 जिल्हा नुसार जाहीर | किती जिल्हे पात्र ?


– नमो शेतकरी योजना ;

या तारखेला येणार पहिला हप्ता 2 हजार रुपये . येथे क्लिक करा .


तुमच्या मित्रांना पाठवा -
5 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *