crop insurance 2023 : पिक विमा कुठल्या आधारावर जाहीर करतात ? मी पिक विमा काढलेला आहेत , मला विम्याची रक्कम मिळेल का ?

sarkarisamrat.com
6 Min Read
तुमच्या मित्रांना पाठवा -

crop insurance 2023, crop insurance 2024


मित्रांनो सन 2023-24 साठी महाराष्ट्र सरकारने एक रुपयात पिक विमा काढून दिलेला आहेत. व गेल्या एक महिन्यापासून पाउस कमी जास्त असून शेतमालाचे नुकसान होत आहेत.  त्यामुळे शेतकर्याला आपण या विम्याचा भरपाई साठी पात्र आहेत का असा प्रश्न आलेला आहेत.

पिक विम्याची भरपाई किती असेल, कसे ठरवतात ? विम्यासाठी पावसाचा किती दिवस खंड पडला पाहिजे ? पिक विमा कुठल्या आधारावर जाहीर करतात ? पिक विमा काढण्याचे सूत्र काय ? मी पिक विमा काढलेला आहेत , मला विम्याची रक्कम मिळेल का ?  इत्यादी प्रश्नाची उत्तरे आपल्याला या लेखात मिळणार आहेत. crop insurance 2023

crop insurance 2023

crop insurance 2023


पिक विम्यासाठी पावसाचा किती दिवस खंड पडला पाहिजे ?

महाराष्ट्रामध्ये सलग 21 दिवस जर पाउस आला नाही तर पिक विमा मिळू शकते . या 21 दिवसात 2.4 मिली मीटर पाउस पडलेला नसावा . आता समजा पडला कमी पाउस तर पुढे काय ? या साठी खालील तीन बाबी महत्वाचा आहेत.

पिक विमा जाहीर करण्यासाठी खालील तीन गोष्टी शेतकऱ्याचा बाजूने असायला हवेत.

1 नैसर्गिक नुकसान भरपाईचे मापदंड – 

महाराष्ट्रातील विविध विभाग मध्ये पाउस सलग 21 दिवस 2.4 मिमी मीटर पेक्षा कमी झाला , व दरवर्षी सरासरी पेक्षा उत्पादन घट दिसून येत असेल तर पिक विमा जाहीर करण्यासाठी पुढील प्रयत्न केले जाते.  crop insurance 2023

2 जिल्हाधिकारी यांचे सर्वेक्षण – 

समजा नैसर्गिक बाबी या सरासरी उत्पादन घट दर्शवत असेल तर जिल्हाधिकारी हे तालुका पिक विमा समितीला सर्वेक्षण करण्याचे आदेश देते . त्यासाठी पिक विमा समितीला आठ दिवसाचा कालावधी दिलेला असतो.

या समितीत तालुका कृषी अधिकारी , पिक विम्याचे प्रतिनिधी , विशेष जाणकार , आणि काही शेतकरी असे यांचा समावेश असतो.

जर या तालुका समितीने या वर्षी उत्पादन 50% टक्के पेक्षा कमी राहील असा अहवाल दिला तर जिल्हाधिकारी तुमच्या मंडळामध्ये  25% नुकसान भरपाईची अधिसूचना काढू शकतात .crop insurance 2023

3 विमा कंपन्याचे सर्वेक्षण – 

जिल्हाधिकार्याने काढलेली 25% नुकसान भरपाईची देण्याची अधिसूचना विमा कंपनी देऊ शकतात. किंवा ते नाकारू पण शकतात.

पण आता समजा विमा कंपनीने 25% नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले तर आपल्याला किती पैसे मिळणार.


 

 crop insurance 2023

 


crop insurance 2023

मित्रा ते.. अमेरिकेत कापसाची शेती कशी केली जाते ? पहा येथे.

अच्छा ! हे आहेत आधुनिक शेतीचे 5 वेगवेगळे प्रकार. मातीची गरज पण नाही.


पिक विमा मिळण्याचे गणित –

समजा तुमच्या मंडळातील सोयाबीन चे उत्पादन मागील सात वर्षात सरासरी 10 किंटल आहेत. आणि या वर्षी सर्वेक्षण अहवाल सांगते की 50% नुकसान किंवा उत्पादन घट आहेत.  म्हणजे या वर्षी 5 किंटल उत्पादन होणार आहेत.

अश्या परिस्थितीत सूत्र वापरले जाते.

अग्रिम भरपाई  =

सरासरी – यंदाचे उत्पादन                                                                                                                                                ————————- x   संरक्षित रक्कम x 25%                                                                                                         सरासरी उत्पादन

सूत्रानुसार तुम्हाला किती नुकसान भरपाई मिळू शकते .

सूत्रानुसार भरपाई –

सरासरी उत्पादन 10 किंटल – यंदाचे 5 किंटल                                                                                                                   ——————————————   x  संरक्षित रक्कम 50 हजार x 25% = 6250 रुपये                                              सरासरी 10 किंटल

तुम्हाला नुकसान भरपाई  म्हणून 6 हजार 250 रुपये मिळू शकते . crop insurance 2023

crop insurance 2023

crop insurance 2023


तर आता आपल्याला इतकीच भरपाई मिळेल का ? नाही . आता बाकीची पिक विमा काढण्याची पुढची स्टेप हि पिक कापल्यानंतर सुरु होते .

पिक कापणी नंतर जर नुकसान भरपाई जास्त निघत असेल तर हे आताची दिलेली नुकसान भरपाई वजा करून जास्तीची नुकसान भरपाई मिळू शकते .

आपण घेतलेले हे आकडे फक्त उदाहरणासाठी आहेत. तुम्ही  सूत्रानुसार तुमची नुकसान भरपाईची रक्कम पाहू शकता .

या वर्षी येणारी पिक विम्याची यादी आम्ही लवकरच तुम्हाला देऊ त्यामुळे तुम्ही whatsapp group ला जॉईन व्हा .


crop insurance 2023

मित्रा ते.. अमेरिकेत कापसाची शेती कशी केली जाते ?

पहा येथे.

महाराष्ट्रात किवी फळाची शेती होऊ शकते का ? किवी फळाची शेती कशी करतात?,

किवी फळाला इतकी मागणी का आहेत , जाणून घ्या .

 

पिक विमा स्थिती कशी तपासतात ?

तुम्हाला तुमची  crop insurance 2023 पिक विमा स्थिती तपासायची असेल अथवा कोणतेही प्रश्न असेल तर तुम्ही हेल्पलाईन नंबर वर फोन करू शकता .

हेल्पलाईन नंबर- 01123381092

अथवा crop insurance 2023 तुम्ही तुमची समस्या इमेल द्यारे पोहचू शकता .

email –  help.agri-insurance@gov.in

अधिकृत वेबसाईट – https://krishi.maharashtra.gov.in/

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: महिलांना 1500 रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार. ( mukhyamantri majhi ladki bahin yojana maharashtra )


तुमच्या मित्रांना पाठवा -
7 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *