महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजना 2023 | अर्ज , पात्रता , नवीन लाभ , संपूर्ण माहिती | mahatma jyotiba phule jan aarogya yojana 2023 | apply, eligibility, etc.
नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात सामान्य लोकाच्या हिताची व कल्याणकारी योजना राज्य सरकार वेळोवेळी राबवत असते . त्यातीलच एक कल्याणकारी योजना म्हणजे महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजना आहे. हि योजना महाराष्ट्रातील अनेक रुग्णालयात सुरु होती .व इत्यादी लोकांनी गंभीर आजारामध्ये या योजनेचा लाभ घेतलेला आहे . या योजने मार्फत सामान्य व्यक्तीला गंभीर आजारामध्ये वैद्यकीय सुविधांचा लाभ दिला जात होता . ज्यात रुग्ण्यालयात असलेल्या व्यक्तीला 1.5 लाख रुपया पर्यंत विमा दिला जात होता . या आरोग्य विम्याचे संरक्षण देऊन सामान्य व्यक्तीला त्याच्या कठीण वेळेत आर्थिक मदत करत होते . व त्याचा जीवनात स्थिरता निर्माण करण्याचे काम राज्य सरकार करत होते . कोरोना काळात तर लाखो लोकाना या योजनेचा लाभ मिळाला होता . व त्यांचे जीवनमान वाचवण्याचे काम राज्य सरकारने या योजनेमार्फत केलेले होते .
परंतु आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द फडणवीस यांनी विधान परिषदेत या योजनेची मुदत वाढवून या योजने मध्ये काही बदल केल्याची घोषणा केलीली आहे . तर या योजनेत काय बदल करण्यात आला ? नवीन पात्रता काय आहे ? अर्ज कसा भरावा तसेच नवीन रुग्यालायाची माहिती या लेखात दिलीली आहे त्यामुळे हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा .
महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजनेचा उगम –
महाराष्ट्र सरकारने 2 जुलै 2012 रोजी महाराष्ट्रात राजीव गांधी जीवनदायी योजना सुरु केलेली होती . हि योजना महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यात सुरु केलीली होती ज्यामध्ये मुंबई,ठाणे , धुळे, नांदेड,अमरावती,गडचिरोळी, सोलापूर, रायगड , जिल्याचा समावेश होता . या योजनेत जवळपास 971 प्रकारचा शस्त्रक्रिया व थेरपी चा समावेश होता. काही काळानंतर हि योजना महाराष्ट्रातील 35जिल्यात राबवण्यात आली.
1 एप्रिल 2017 पासुन राजीव गांधी जीवनदायी योजनेचे नाव बदलून महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजना करण्यात आले . व योजनेच्या सुरळीत व्यवहारासाठी एक कॉल सेंटर बनवण्यात आले . तसेच ” निरोगी महाराष्ट्र , प्रगतशील राष्ट्र ” हे घोषवाक्य सुद्धा ठेवण्यात आले .
योजनेचा लाभ काय होता ?
महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजना हि गरीब व कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबाना मोफत व उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देऊन त्यांचा जीवनात स्थिरता आणण्याचे काम राज्य सरकार करत होती .योजने अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या आजारांचा प्रकीयेमधील आजाराचा उपचारासाठी कुटुंबातील एक अथवा सर्व सदस्यासाठी वार्षिक विमा संरक्षण 1.5 लाख रुपये ठेवण्यात आलेले होते . तसेच किडनी प्रत्यारोपण प्रकीयेमध्ये हि मर्यादा तीन लाख रुपये होती .
योजनेमध्ये समाविष्ट लाभार्थी –
महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजना मध्ये खालील कुटुंबाचा समावेश होतो .
- अनःपूर्ण योजना पिवळे राशन कार्ड धारकचा समावेश होता .
- ज्या कुटुंब कडे केशरी कार्ड आहे व त्यांचे उत्पन्न 1 लाखाच्या कमी आहे अश्या कुटुंबाचा समावेश या योजनेत होतो.
- पांढरे राशन कार्ड धारक ( अमरावती , औरंगाबाद , नागपूर अश्या 14 शेतकरी आत्महत्या ग्रस्त जिल्हात ) असलेल्या कुटुंबाना या योजनेचा लाभ घेता येतो .
- या व्यतिरिक्त अनाथ आश्रम मधील महिला व आश्रम शाळेतील विद्यार्थी .
- जेष्ठ नागरिक
- अधिकृत पत्रकार व त्यांचे कुटुंब
- अपंग व्यक्ती
हे सगळे या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
लेक लाडली योजना : तुमच्या मुलीला मिळणार 75000 रुपये.
महत्वाचे –
महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी असणारा आजार अथवा शस्त्रकीया योजनेमध्ये असणे गरजेचे आहे . त्यासाठी एकदा रुग्णालयात भेट देऊन विचारपुस नक्की करा.
योजनेचे बदललेले स्वरूप –
महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजना आतापर्यंत लाभार्थी व्यक्तीला अथवा त्याचा कुटुंबाना 1.5 लाख रुपयाची सवलत देत होते ज्यातून गरीब कुटुंब मोफत उपचार घेत होता .
परंतु आता हे मर्यादा वाढवून 5 लाख केलीली आहे . अशी घोषण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली . विशेष बाब म्हणजे महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजना मध्ये 200 नवीन रुग्यालयाची भर टाकून त्यांचा समावेश करण्यात आला आहे . त्यामुळे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणार आहे. व मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रकीयांचे लाभ मर्यादा वाढवून 4 लाख करण्यात आलेली आहे .
याशिवाय राज्य भरात 700 नवीन दवाखान्याची भर टाकून त्यांची स्थापना करण्यात येणार आहे . व ते स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा नावाने सुरु करण्याची घोषणा शिंदे व फडणवीस सरकार कडून करण्यात आलेली आहे.
योजनेत समाविष्ट असलेले काही उपचार –
महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजना मध्ये खालील काही उपचाराचा समावेश आहे .
- सर्व साधारण शस्त्रकीया
- नेत्ररोग शस्त्रकीया
- स्त्रीरोग व प्रसुतीशात्र
- अस्तीरोग शस्त्रकीया व प्रकिया
- पोट व जठार शस्त्रक्रिया
- बालरोग शस्त्रक्रिया
- प्रजनन व मूत्ररोग
- कर्करोग शस्त्रक्रिया
- त्वचारोग प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
- जळीत
- संसर्गजन्य रोग
- हृदयरोग
- नेफ्रोलोजी
- चर्मरोग चीकीत्स्या
- इत्यादी
- रोगाचा माहितीसाठी रुग्यालयात भेट द्यावी .बाकी
अर्ज कुठे करायचा –
अर्ज अधिकृत वेबसाईट जाऊन ओनलाइन करू शकता अथवा रुग्यालयात करू शकता. mahatma jyotiba phule jan aarogya yojana 2023
अधिकृत वेबसाईट -: www.jeevandayee.gov.in
हेल्पलाईन नंबर : 1800 233 2200
नमो शेतकरी सम्मान निधी योजना :
लेक लाडली योजना : तुमच्या मुलीला मिळणार 75000 रुपये.
लागणारे मुख्य कागदपत्र –
- राशन कार्ड
- ओळख पत्र
- 7 /12 उतारा ( शेतकरी आत्महत्या ग्रस्त जिल्हातील कुटुंबां साठी )
- शासन मान्य पुरावा ( अनाथालय , महिला आश्रम साठी )
- फोटो
- शाळा कॉलेज आयडी
- छाया चित्रा सह राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
- बाकी अतिरिक्त कागदपत्र सुद्या लागू शकतात त्यासाठी एकदा रुग्ण्यालयात विचारपूस करावी.Q Q
FAQ –
1 . महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजना मध्ये किती रुपयाचा लाभ मिळणार ?
उत्तर – या योजनेत आता प्रती कुटुंब 5 लाख रुपयाची वार्षिक मदत मिळणार.
2 . कितीं नवीन रुग्णालयात हि योजना राबविण्यात येणार आहे?
उत्तर- 200 नवीन रुग्ण्यालयात हि योजना राबविण्यात येणार आहे .
3. महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजना कधी सुरु झाली ?
उत्तर – हि योजना 1 एप्रिल 2017 रोजी सुरु करण्यात आली.
नमो शेतकरी सम्मान निधी योजना :
लेक लाडली योजना : तुमच्या मुलीला मिळणार 75000 रुपये.