Lek Ladki yojana 2023 : लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023 | पात्रता, वेबसाईट, अर्ज प्रक्रिया, संपूर्ण मराठी माहिती.

sarkarisamrat.com
4 Min Read
तुमच्या मित्रांना पाठवा -

Lek ladli yojana 2023 : लेक लाडली योजना महाराष्ट्र 2023 ( पात्रता ,अर्ज कसा करावा ,लाभ, ई .)(apply,eligibility,benefits,etc.)

 नमस्कार मित्रांनो ,      महाराष्ट्र राज्य सरकार मुलींसाठी लेक लाडकी योजना 2023(Lek Ladki yojana 2023) घेऊन आलेले आहेत . आर्थिक वर्ष 2023-24 अर्थसंकल्पात हि योजना सुरु करण्याची घोषणा करण्यात आलेली आहेत. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले कि, लेक लाडकी योजना 2023 या योजनेच्या माध्यामातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना या योजनेतून आर्थिक मदत देण्यात येईल. lek ladki yojana 2023 अर्ज कसा भरायचा ? कोण पात्र आहे ? या सर्व माहितीसाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा .

शेवट पर्यंत वाचा !!


लेक लाडकी योजनेचे स्वरूप व उद्देश  :-

महाराष्ट्र लेक लाडकी योजनेमार्फत मुलीच्या जन्मापासून तर तिच्या शिक्षणापर्यंत म्हणजेच मुलीचे वय अठरा पूर्ण होईपर्यंत  तिला आर्थिक मदत सरकार करणार आहे. लेक लाडकी योजनेतून मुली संबधित सकारात्मक विचारसरणी व सकारात्मक वातावरण करण्यात येणार आहे. गरीब कुटुंबातील मुलींना ओझे मानले जाऊ नये असा उद्देश या योजनेचा आहे . तसेच गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना आर्थिक मदत देऊन त्यांना स्वावलंबी व  सक्षम करून त्यांचे भविष्य उज्ज्वल करणे सरकारचे लक्ष्य आहे . तर आता आपण पाहूया सरकार लेक लाडकी योजनेमध्ये (lek ladli yojana2023)  किती रक्कम लाभाच्या स्वरुपात देणार आहे.


लेक लाडकी योजनेचे लाभ :-

लेक लाडकी योजनेमध्ये मदत हि पैशाच्या स्वरूपात मिळणार आहे.  ज्यामध्ये  मुलीच्या जन्मानंतर  5000  हजार  रुपये  दिले जातील. तसेच मुलगी 4 थी मध्ये गेल्यावर तिला 4000 हजार रुपये व 6 वी मध्ये गेल्यावर 6000 हजार रुपये दिले जातील . त्यानंतर मुलगी 11 वी मध्ये गेली असता मुलीच्या बँक खात्यावर 8000 हजार रुपये जमा करण्यात येणार आहे. व त्याचप्रमाणे मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर शेवटचे 75000 हजार रुपये मुलीला देण्यात येणार आहे. आता आपण पाहूया lek ladki yojana 2023 मध्ये कोण पात्र आहे ?


लेक लाडकी योजनेसाठी पात्रता :-

  1. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे अनिवार्य आहे .
  2. मुलीचा जन्म सरकारी दवाखाण्यात झाला पाहिजे.
  3. कुटुंबाकडे राज्यातील  पिवळे अथवा केशरी  राशन कार्ड असणे अनिवार्य आहे.
  4. आर्थिक मदतीचा लाभ घेण्यासाठी पालकांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
  5. पालकांचे आधार कार्ड असणे महत्वाचे आहे.

लेक लाडकी योजनेसाठी लागणारे कागदपत्र :-

  1. पालकांचे आधार कार्ड
  2. पिवळे अथवा केशरी राशन कार्ड
  3. रहिवाशी दाखला
  4. मुलीचे जन्म प्रमाणपत्र
  5. उत्पन्न प्रमाणपत्र
  6. बँक खाते
  7. मोबाईल नंबर

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करायचा ??

यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट वर ऑनलाइन अर्ज करायचा आहे. परंतु अजून Lek Ladki yojana 2023 याची वेबसाईट बनवण्यात आलेली नाही . त्यामुळे सद्यस्थिती  अर्ज प्रकिया सुरु झालेली नाही . लवकरच अर्ज प्रकिया सुरु होईल त्यामुळे तुम्ही आमच्या whatsappp ग्रुप ला जॉईन व्हा तेथे याची अपडेट देण्यात येईल.

 हे पण वाचा –

घरकुल योजनेच्या नियमात झाला मोठा बदल | सरपंच व ग्रामसेवकचे हे अधिकार काढले.

तेथे वाचा.


हे पण वाचा –

 नमो शेतकरी सम्मान योजना पहिला हप्प्ता येणार या दिवशी .

येथे क्लिक करा .


FAQ.

1 –  लेक लाडली योजनेचा लाभ कसा मिळेल ?

उत्तर – यासाठी ऑंनलाइन अर्ज करावा लागणार आहे परंतु सद्या Lek Ladki yojana 2023 ची  साईट बनलेली नाही.


2-    कोणत्या मुली पात्र आहे ?

उत्तर – ज्यांच्या कडे पिवळे अथवा केशरी राशन कार्ड असेल त्या पात्र आहे .


3 –  लेक लाडली योजना कधी जाहीर झाली ?

उत्तर – सन  2023-24 मध्ये विधान परिषदेत याची घोषणा करण्यात आली.


 हे पण वाचा –

घरकुल योजनेच्या नियमात झाला मोठा बदल | सरपंच व ग्रामसेवकचे हे अधिकार काढले.

तेथे वाचा.



संपूर्ण लेख वाचल्याबद्दल — !! धन्यवाद !!



हे पण वाचा –

 नमो शेतकरी सम्मान योजना पहिला हप्प्ता येणार या दिवशी .

येथे क्लिक करा .


तुमच्या मित्रांना पाठवा -
11 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *