मागेल त्याला शेततळे योजना | सगळ्यांना मिळणार पाणी | Magel Tyala Shettale yojana अर्ज प्रकिया, संपूर्ण मराठी माहिती |

sarkarisamrat.com
5 Min Read
तुमच्या मित्रांना पाठवा -

मागेल त्याला शेततळे योजना | सगळ्यांना मिळणार पाणी | Magel Tyala Shettale अर्ज प्रकिया, संपूर्ण मराठी माहिती | Magel Tyala Shettale yojana |


नमस्कार शेतकरी मित्रांनो , भारत हा शेती प्रधान देश आहेत . आणि या शेतीसाठी लागणारी  सर्वात महत्वाची  नैसर्गिक देणगी म्हणजे पाणी.  ज्या राज्यात पाण्याचे स्त्रोत जास्त असतात तेथे शेती मोठ्या प्रमाणात पिकते , व शेतकर्यांना जास्त आर्थिक नफा कमावून देते. आपल्या महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी पाण्याचे स्त्रोत मुबलक प्रमानात आहेत.  परंतु विदर्भ व इतर काही भागात खूप कमी पाण्याचे स्त्रोत आहे.

महाराष्ट्रातील बहुसंख्य शेतकरी पिकाच्या वाढीसाठी  नैसर्गिक  पाण्यावर अवलंबून असते. व या कोरडवाहू शेतीमध्ये जर वेळेवर पाउस नाही झाला तर पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. व शेतकर्याची आर्थिक स्थिती कमजोर होते. तसेच दर वर्षी जमिनीतील पाण्याची पातळी कमी कमी होत आहेत. या व इत्यादी अनेक कारणांसाठी महाराष्ट्र सरकारने ” मागेल त्याला शेततळे योजना ” सुरु केली आहेत.  तर काय आहे Magel Tyala Shettale yojana हि योजना? कोण कोणते लाभ मिळू शकते ? अर्ज कसा करायचा ? इत्यादी प्रश्नाचे उत्तर आपण या लेखात पाहणार आहोत तर हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.


योजनेचे स्वरूप -Magel Tyala Shettale yojana 

गेल्या काही वर्षा पासुन पावसाचे प्रमाण खूप कमी व अंदाज लावण्या सारखे राहलेले नाहीत . कधी पण पाउस येतो. आणि गरज असताना पाणी येतच नाहीत. त्यामुळे कोरडवाहू शेतीला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी मागेल त्याला शेततले योजना सुरु केली आहेत.

ज्या शेतकऱ्याला शेततळे हवे आहेत त्यांनी कृषी विभागात अर्ज करून स्वतासाठी शेततळे खोदून घेऊ शकते. त्यासाठी अनुदान सरकार देणार आहेत. अनुदानाची रक्कम आयुक्त कृषी यांनी शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर त्वरीत निश्चित करावी व त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना त्वरित निर्गमित कराव्यात. अन्यथा  अनुदानाची कमाल रक्कम रुपये पन्नास हजार इतकी राहील रुपये पन्नास हजार पेक्षा जास्त खर्च झाल्यास उर्वरित रक्कम संबंधित लाभार्थ्याने स्वतः खर्च करणे आवश्यक असणार आहे.

Magel Tyala Shettale yojana  साठी जास्तीत जास्त पाच शेतकऱ्यांचा गट करून त्यांना एकत्रित रित्या सामुदायिक शेततळे घेता येईल. या शेततळ्याचे आकारमान दिलेल्या आकारमानाच्या प्रमाणात राहील. तसेच त्यांना मिळणारे अनुदान व वापरण्यात येणाऱ्या  पाण्याची टक्केवारी याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करार करून  तो अर्जासोबत सादर करणे अनिवार्य राहील.

मागेल त्याला शेततळे योजना


योजनेसाठी पात्रता    – 

  1. या  योजनेत पात्र होण्यासाठी शेतकऱ्याच्या नावावर कमीत कमी 0.60 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहेत.
  2. याआधी शेतकर्याने कोणत्याही इतर शेततळे,सामुदायिक शेततळे किंवा बोडी घटकाचा काभ घेतलेला नसावा .
  3. Magel Tyala Shettale yojana  शेतकर्याची  शेततळ्यासाठी देणारी जमीन तांत्रिक दुष्ट्या पात्र असावी .

    महाराष्ट्र पिक विमा यादी

    2023 जिल्हा नुसार जाहीर | किती जिल्हे पात्र ?


    – नमो शेतकरी योजना ;

    या तारखेला येणार पहिला हप्ता 2 हजार रुपये . येथे क्लिक करा .


    ट्रैक्टर अनुदान योजना; 

     मिळणार 50% अनुदान | असा करा अर्ज.. संपूर्ण मराठी


    शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2023 |
    मिळणार 2 लाख 21 हजार रुपये



योजनेच्या अटी व नियम – 

  1. शेतकऱ्याला कृषी विभागाचे कृषी सहाय्यक अधिकारी यांनी नेमलेल्या जागीच शेततळे घेणे बंधनकारक आहे.
  2. विभागातून अनुमती मिळाल्यावर तीन महिन्याचा आत शेततळे चे काम पूर्ण करणे बंधनकारक आहे.
  3. लाभार्थ्याने राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुकची झेरोक्स  संबंधित अधिकाऱ्या कडे जमा करणे आवश्यक आहेत.
  4. शेततळ्याची निघा राखणे किंवा दुरुस्ती करण्याची जवाबदारी लाभार्थीची असणार आहेत.
  5. शेततळ्यात गाळ वाहून येणार नाही किंवा साचणार नाहीत यासाठी व्यवस्था लाभार्थ्याने करावी.
  6. सातबारा वर शेततळ्याची नोंद घेणे बंधनकारक राहील.
  7. शेततळे पूर्ण झाल्यावर शेत तळ्याचा बोर्ड स्वखर्चाने लावणे शेतकऱ्याला बंधनकारक राहील.
  8. शेताच्या बांधावर व पाण्याच्या प्रवाहाचा भागामध्ये झाडे लावावी लागेल.
  9. इनलेट व आउटलेट विरहित शेततळी घेणाऱ्या लाभार्थ्यास कडे शेततळ्यांमध्ये पाणी उचलून टाकण्याची आवश्यकता व त्या सर्व सुविधा असणे आवश्यक आहे. तसेच अशा शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांनी प्लास्टिक अस्तरीकरण स्वखर्चाने करावे.
  10. मंजूर आकारमानाचे शेततळे खोदणे हे लाभार्थीस बंधनकारक राहील.

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे – 

  1. जमिनीचा सातबारा उतारा
  2. जमिनीचा आठ अ उतारा
  3. दारिद्र रेषेखालील राशन कार्ड किंवा आत्महत्याग्रस्त कुटुंबाचा वारसाचा दाखला
  4. आधार कार्ड
  5. बँक पासबुक
  6. फोटो
  7. मोबाईल नंबर

अर्ज कुठे करायचा – 

Magel Tyala Shettale yojana  यासाठी तुम्ही नजीकचा  कोणत्याही आपले सरकार केंद्रात जाऊन अर्ज करू शकता तसेच तालुका कृषी अधिकारी यांना भेट देऊ शकता .

अधिकृत वेबसाईट – https://aaplesarkar.maharashtra.gov.in

Magel Tyala Shettale yojana  इतर सर्व माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या .



महाराष्ट्र पिक विमा यादी

2023 जिल्हा नुसार जाहीर | किती जिल्हे पात्र ?


– नमो शेतकरी योजना ;

या तारखेला येणार पहिला हप्ता 2 हजार रुपये . येथे क्लिक करा .


ट्रैक्टर अनुदान योजना; 

 मिळणार 50% अनुदान | असा करा अर्ज.. संपूर्ण मराठी


शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2023 |
मिळणार 2 लाख 21 हजार रुपये


 

 


तुमच्या मित्रांना पाठवा -
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *